कोरोनिल: बाबा रामदेव यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करणार राजस्थान सरकार


जयपूर – राजस्थान सरकारने बाबा रामदेव यांच्या कोरोना प्रतिबंधक कोरोनिल औषध शोधण्याच्या दाव्याला फसवे असल्याचे म्हटले आहे. राजस्थान सरकारचे आरोग्यमंत्री रघु शर्मा याबाबत म्हणतात की महामारीच्या काळात बाबा रामदेव यांनी कोरोना औषधे अशा प्रकारे विकण्याचा प्रयत्न केला, ही चांगली गोष्ट नाही.यासंदर्भातील वृत्त आजतकने दिले आहे.

आरोग्यमंत्री रघु शर्मा म्हणाले की, आयुष मंत्रालयाच्या राजपत्र अधिसूचनेनुसार बाबा रामदेव यांनी आयसीएमआर आणि राजस्थान सरकारकडून कोरोना आयुर्वेद औषधाच्या चाचणीसाठी परवानगी घेतली पाहिजे होते, पण त्यांनी कोणतीही परवानगी आणि कोणत्याही निकषाविना चाचणीचा दावा केला, जो चुकीचा आहे.

रघु शर्मा म्हणाले की, आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू आणि आमच्या एका डॉक्टरने खटला दाखल केला असून तोच त्या खटल्याच्या अंतर्गत केला जाईल. दुसरीकडे, ज्यांनी नेम युनिव्हर्सिटीत गुना कँट घेऊन जाणाऱ्या जयपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे कि, मी तिथे प्रभारी होतो आणि तिथे आम्हाला कोणत्याही प्रकारची औषधाची ट्रायल करण्यास परवानगी घेतली नाही.

त्याचबरोबर मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही कोणतीही चाचणी पाहिलेली नाही. तिथे जेवढेपण रुग्ण होते, त्यांच्यात कोणतीही कोरोनाची लक्षणे नव्हती. कोणालाही ताप अथवा खोकला, त्याचबरोबर घशात खवखव देखील नव्हती. असे सर्व रुग्ण 7 ते 10 दिवसात बरे झाले आणि दुसऱ्या ठिकाणी विना लक्षणाच्या रुग्णांना ठेवण्यात आले होते, ते देखील तेवढ्याच दिवसात बरे झाले.

दरम्यान पतंजली रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने आयुष मंत्रालयाला सांगण्यात आले कि, क्लिनीकल ट्रायल जयपुरच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चमध्ये (निम्स) घेण्यात आले. त्याचबरोबर असा देखील दावा केला की या दरम्यान सर्व नियमांचे पालन करण्यात आले असून आयुर्वेदिक सायन्स सेंट्रल काऊंसिलच्या डीजींना याची माहिती देण्यात आली होती.

कोरोनिलची चौकशी झाल्यानंतर पतंजलीने आयुष मंत्रालयात दाखल केलेल्या शोधपत्रानुसार, कोरोनिलची क्लिनिकल टेस्ट 120 रूग्णांवर केली गेली, ज्यामध्ये कोरोनाची लक्षणे खूप कमी होती. या रुग्णांचे वय 15 ते 80 वर्षे दरम्यान होते.

आता निम्समधील चाचणीची माहिती समोर आल्यानंतर राजस्थान सरकार जागे झाले असून पतंजलीने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे म्हटले आहे. निम्समध्ये कोणत्याही रुग्णाचा अहवाल तीन दिवसात येत नाही आणि ज्या रुग्णांवर चाचणी केली गेली, त्यांचा अहवाल त्याच दिवशी निगेटिव्ह होत होते.

Leave a Comment