BS-6 होंडा ग्रॅझिया 125 स्कूटर नवीन अवतारात लाँच

होंडा मोटारसायक्लस अँड स्कूटर इंडियाने बीएस6 होंडा ग्रॅझिया 125 स्कूटरला लाँच केले आहे. स्टँडर्ड आणि डीलक्स या दोन व्हेरिएंटमध्ये या स्कूटरला लाँच करण्यात आले असून, यांची क्रमशः किंमत 73,912 रुपये आणि 80,978 रुपये आहे. नवीन होंडा ग्रॅझियामध्ये अपडेटेड इंजिनसह अनेक नवीन फीचर देण्यात आलेले आहेत.

Image Credited – navbharattimes

नवीन ग्रॅझियाच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आलेला आहे. स्कूटरमध्ये आता एलईडी डीसी हेडलँम्प देण्यात आले आहेत, जे स्लीक दिसतात. यात एलईडी डीआरएल देखील देण्यात आले आहेत. बाजूचे बॉडी पॅनेल्स शार्प दिसतात. स्कूटरच्या टेल सेक्शन आणि ब्रेक लाइट एसेंबली डिझाईनमध्ये देकील बदल करण्यात आला आहे. नवीन स्कूटर मॅट सायबर येलो, पर्ल स्पार्टन रेड, पर्ल सायरन ब्लू आणि मॅट एक्सिस ग्रे रंगात उपलब्ध आहे.

Image Credited – navbharattimes

बीएस-6 ग्रॅझियामध्ये लाइट स्विच आणि एक्सटर्नल फ्यूल फिलर कॅप देण्यात आले आहे. यात अपडेटेड डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल आहे. ज्यात स्पीड आणि आरपीएम शिवाय सरासरी माइलेज, रियल टाइम माइलेज, डिस्टेंस-टू-एम्पटी आणि 3-स्टेप ईको इंडिकेटर सारखी माहिती दिसते. स्कूटरमध्ये इंजिन स्टार्ट-स्टॉप स्विच आणि इंजिन कट ऑफ सोबत साइड स्टँड सारखे फीचर्स मिळतील. स्कूटर एलॉय व्हिल्जसोबत 12 इंच फ्रंट आणि 10 इंच रियर टायरसोबत येते. यात फ्रंटला 190एमएम डिस्क आणि रियरला 130एमएम ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. यात कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम आणि टेलिस्कोप सस्पेंशन देखील मिळेल.

Image Credited – navbharattimes

इंजिनबद्दल सांगायचे तर यात बीएस-6 मानक 124सीसी, सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल. हे इंजिन ईको टेक्नॉलजी (HET) आणि eSP (इनँन्स्ड स्मार्ट पॉवर) सोबत येते. यात एसीजीसोबत सायलेंट स्टार्ट आणि आइडलिंग स्टॉप सिस्टम मिळेल. इंजिन 8.14 hp पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क जेनरेट करते.

Leave a Comment