बापरे! पुण्यातील लघु उद्योजकाला महावितरण विभागाने पाठवले तब्बल 80 कोटींचे बिल - Majha Paper

बापरे! पुण्यातील लघु उद्योजकाला महावितरण विभागाने पाठवले तब्बल 80 कोटींचे बिल

महावितरण विभागाने चुकीच्या रक्कमेचे बिल पाठवणे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. विभागाकडून अनेकदा टेक्निकल चुकीमुळे असे बिल ग्राहकांना जाते. भोसरी येथील लघु उद्योजकाला महावितरण विभागाने अशाच प्रकारे तब्बल 80 कोटी रुपयांचे बिल पाठवून धक्का दिला. अखेर ही गोष्ट समोर आल्यानंतर विभागाने आता चूक दुरूस्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने सांगितले की, ही नकळत झालेली चूक होती व ही चूक सुधारण्यात आली आहे. ग्राहकाला 85 हजार रुपयांचे योग्य बिल पाठवण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने ही समस्या मांडल्यानंतर एमएसईडीसीएलने स्पष्ट केले की, ही चूक केवळ प्रिंटेड बिलावर होती व ती दुरूस्त करण्यात आली आहे. दुरुस्त केलेले बिल ऑनलाईन देखील अपडेट केले आहे. चुकीचे बिल आधीच पाठवल्याने ही गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले की, र एमएसईडीसीएलकडून अशी प्रकारेच चुकीचे बिल पाठविण्याची ही पहिलीच वेळ नाही. संघटनेमध्ये जवळपास 4,200 सदस्य आहेत व प्रत्येक महिन्याला आमच्याकडे 10 तरी तक्रारी येतात.

पुणे विभागाचे एमएसईडीसीएलचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी स्पष्ट केले की, तांत्रिक चुकीमुळे 80 कोटी रुपयांचे बिल पाठवण्यात आले होते व मात्र आता चूक सुधारण्यात आली आहे.

Leave a Comment