किआ मोटर्सने आणली नवीन ‘कार्निव्हल’

दक्षिण कोरियाची कार कंपनी किआ मोटर्सने आपल्या प्रीमियम एमपीव्ही कार्निव्हलवरील पडदा हटवला आहे. कंपनीने 2021 किआ कार्निव्हल एमपीव्हीचे अधिकृत फोटो जारी केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या वर्षाच्या अखेरपर्यंत ही एमपीव्ही लाँच होणार आहे. तर 2022 पर्यंत भारतात ही एमपीव्ही लाँच होण्याची शक्यता आहे.

Image Credited – news18

कंपनीने नवीन कार्निव्हलला ग्रँड यूटिलिटी व्हिकल म्हटले आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत याचे व्हिलेसबेस लांब आहे. ज्यामुळे जास्त कॅबिन स्पेस मिळेल. नवीन जनरेशन कार्निव्हलची डिझाईन आणि स्टायलिंग किआच्या आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध एसयूव्हीवरून प्रेरित आहे. याच्या पुढील बाजूला क्रोम आणि डायमंड पॅटर्नसोबत किआचे सिग्नेचर टायगर नोझ ग्रिल, एंग्युलर हेडलँम्प, एलईडी डीआरएल, फॉक्स स्किड प्लेट आणि क्रोम फिनिशिंगसोबत लोअर एअर इन्टेक दिले आहेत. लांब बोनेट आणि लहान ओव्हरहँड देखील यातील मोठा बदल आहे.

Image Credited – navbharattimes

रियर लूकबद्दल सांगायचे तर कार्निव्हलच्या मागील बाजूला स्लिम एलईडी हेडलँम्प देण्यात आले आहे. दोन्ही टेललँम्प एका लांब एलईडी लाइटबारशी जोडलेले आहेत. त्याच्या वरती क्रोम एक्ससेंट देण्यात आले आहे. कंपनीने अद्याप इंटेरियरचे फोटो शेअर केले नाहीत. मात्र लीक झालेल्या फोटोनुसार, नवीन कार्निव्हलमध्ये 3 स्पोक मल्टी फंक्शनल स्टेअरिंग व्हिल, ड्युल डिस्प्ले असेल. ड्युल सनरूफ, सीटिंग अरेजमेंट सारखे अन्य फीचर जुन्या मॉडेलप्रमाणेच असतील.

Image Credited – navbharattimes

इंजिनबद्दल सांगायचे तर किआ कार्निव्हलमध्ये 2.5 लीटर, 4 सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन 277बीएचपी पॉवर आणि 421एनएम टॉर्क जनरेट करते. याशिवाय यात 1.6 लीटर हायब्रिड इंजिन पर्याय देखील मिळू शकतो. काही निवडक मार्केटमध्ये कार्निव्हल 2.2 लीटर डिझेलमध्ये येऊ शकते.

Leave a Comment