उत्तर प्रदेश सरकारचा चीनला झटका, घातली या चीनी वस्तूच्या वापरावर बंदी

लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्याच्या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले होते. सीमावादानंतर आता चीनी कंपन्यांचे करार रद्द करण्याची, चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर पकडत आहे. याच पार्श्वभूमीवर आता उत्तर प्रदेशच्या सरकारने चीनी निर्मिती वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. उर्जा विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये आता चीनमध्ये बनलेल्या वीजेच्या स्मार्ट मीटरवर बंदी घातली आहे. या संदर्भात इंडिया.कॉमने वृत्त दिले आहे.

त्यांनी सांगितले की, वीज विभागाने मागील एक वर्षात चीनमध्ये बनलेले मीटर आणि अन्य उपकरणांची कोठे कोठे ऑर्डर देण्यात आली याचे विवरण मागितले आहे. ऑल इंडिया पॉवर इंजिनिअर फेडरेशनचे अध्यक्ष शेलेंद्र दुबे यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, वीज सयंत्रामध्ये बॉयलरपासून ते ट्यूब व अन्य उपकरण चीनमधून मागवले जातात. ते स्वस्त असल्याने खरेदी केले जातात. मात्र या वस्तूंची गुणवत्ता चांगली नसते, हे देखील सत्य आहे.

वीज सयंत्राच्या सर्व उपकरणाची खरेदी भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कडून करावी, असे दुबे म्हणाले.

Leave a Comment