WHO चा इशारा; देऊ नका सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी


नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव यशस्वीरित्या रोखणाऱ्या जगभरातील अनेक देशांनी सध्या आपल्याकडील धार्मिक त्याचबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. परिणामी त्यांच्याकडील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निदर्शनास आणून दिले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये जाहीरपणे तर काही ठिकाणी नाईट क्लब किंवा बंद ठिकाणी हे कार्यक्रम पार पडत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

कोरोनाची दुसरी लाट या व्हायरसला रोखण्यात यशस्वी ठरलेल्या दक्षिण कोरियात आली आहे. दक्षिण कोरियाचा उल्लेख करताना जागतिक आरोग्य संघटनेने अनेक देशांनी संसर्ग रोखण्यात यश मिळवले होते, पण लोक संपर्कात येणे पुन्हा सुरु झाल्याने रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या विषाणूंना संधी मिळेल तिथे लगेच फैलाव होणार असे सांगताना जागतिक आरोग्य संघटनेने समूह संसर्ग रोखण्यासाठी शक्य ते सर्व करा, असे आवाहन सर्व देशांना केले आहे.

Leave a Comment