आमच्या एअरलाईन्सवर अन्याय, अमेरिकेने घातले भारताच्या स्पेशल फ्लाईट्सवर निर्बंध - Majha Paper

आमच्या एअरलाईन्सवर अन्याय, अमेरिकेने घातले भारताच्या स्पेशल फ्लाईट्सवर निर्बंध

अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी जाणाऱ्या स्पेशल चार्टड विमानांवर अमेरिकेने प्रतिबंध घातले आहे. अमेरिकेने अनुचित आणि भेदभाव वृत्तीचा आरोप केला आहे. दोन्ही देशांमध्ये असलेल्या उड्डाण कराराचा हा भंग असल्याचे म्हटले आहे. परिवहन विभागाने म्हटले आहे की, एअर इंडिया लिमिटेड कोरोना संकटाच्या काळात आपल्या नागरिकांना मायदेशी नेत आहेत, सोबतच लोकांना तिकिटांची देखील विक्री करत आहे.

विभागाचे म्हणणे आहे की, मात्र दुसरीकडे अमेरिकेच्या विमान कंपन्यांना भारतात उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही स्थिती अमेरिकन विमानांसाठी हानीकारक आहे. विभागाने म्हटले आहे की, एअर इंडिया ही व्हायरसच्या आधीच्या काळातील ऑपरेशन्सची जाहीरात करत आहे. चार्टर्स केवळ नागरिकांना परत नेत नाही तर त्याही पेक्षा जास्त नागरिकांना परत नेण्याच्या नावाखाली धोका देत आहे. त्यामुळे निर्बंध लादण्यात आले आहे. हे निर्बंध 30 दिवस राहतील.

विभागाने म्हटले आहे की, भारतीय एअरलाईन्सनी चार्डर उड्डाणांच्या संचालना आधी डीओटीला अर्ज करावा, जेणेकरून त्याची तपासणी करता येईल. अमेरिकन कॅरिअर्सवर भारताने लावलेले निर्बंध हटवल्यावर अमेरिका देखील निर्बंध हटवण्याचा विचार करेल, असे म्हटले आहे.

Leave a Comment