कोरोनामुळे गेली शिक्षकाची नोकरी, आता पत्नीसोबत मिळून विकत आहे इडली-सांभर

कोरोना व्हायरसमुळे असंख्य लोकांचे आयुष्य बदलून गेले आहे. या काळात अनेकांची नोकरी गेली आहे. पदवी, पदव्युत्तर शिक्षण असले तरी पेशा सोडून भाजी विकणे, फळे विकणे अशी काम लोकांना करावी लागत आहे. तेलंगानाच्या एका खाजगी शाळेतील शिक्षकाने नोकरी गेल्याने आता आपल्या पत्नीसोबत मिळून साउथ-इंडियन पदार्थांची हातगाडी लावली आहे.

या शिक्षकांचे नाव रामबाबू मारागनी आहे. ते खम्मम शहरातील खाजगी शाळेत शिकवत असे. मात्र कोरोना व्हायरसमुळे त्यांची नोकरी गेली. अशाही स्थितीमध्ये त्यांनी हार न मानता घरातच राहण्यापेक्षा पत्नीसोबत मिळून छोटा-मोठा उद्योग करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की, कोणावरही अवलंबून राहू नये, स्वतःच्या पायावर उभे राहावे.

https://twitter.com/sujitbombay1/status/1275305271145922560

ट्विटरवर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकरी रामबाबू मारागनी यांच्या हिंमतीला दाद देत आहे. अनेक युजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment