कोरोनामुक्त व्यक्तींना नंतर सुध्दा आयुष्यभरासाठी निर्माण होऊ शकतात या समस्या – स्टडी

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. या आजाराची लागण झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांवर परिणाम होत असतो. आता एका अभ्यासात समोर आले आहे की कोरोनातून बरे झालेल्या तीन पैकी एका व्यक्तीला आयुष्यभर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते. दीर्घकाळासाठी त्यांचा फुफ्फुसाला देखील नुकसान पोहचू शकते.

ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या गाइडेंसनुसार, कोरोनातून बरे झालेल्या 30 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसाला नुकसान पोहचू शकते. त्यांना वारंवार थकवा जाणवणे आणि मानसिक आरोग्याची समस्या होऊ शकते. आयसीयूमधून बरे होऊन परतलेल्या रुग्णांवर दीर्घकाळ याचे परिणाम होऊ शकतात.

आज तकच्या वृत्तानुसार, आरोग्यविषयक तज्ञांनी म्हटले या गोष्टींचे वारंवार पुरावे मिळत आहेत की कोरोनामुळे शरीरावर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतात. बरे झालेल्या रुग्णांच्या मेंदूवर देखील परिणाम होऊ शकतो व त्यांना अलजाइमर होण्याचा धोका निर्माण होतो. एनएचएसच्या कोव्हिड रिकव्हरी सेंटरच्या प्रमुख हिलरी फ्लॉयड म्हणाल्या की कोरोनाच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल फारशी माहिती नाही याची चिंता आहे. कोरोना नेगेटिव्ह असूनही बर्‍याच रुग्णांना उपचारांची आवश्यकता असते.

त्यांनी सांगितले की, 40-50 वर्षांचे जे रुग्ण बरे झाले आहेत त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे लोक जिम, स्विमिंग, उद्योग या गोष्टी स्वतः करत असे. मात्र कोरोना नेगेटिव्ह असताना देखील ते स्वतःच्या बेडवरून उठू शकत नाही.

Leave a Comment