चीनच्या मदतीने भारताला अडकविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न, अमेरिकेने रोखला डाव - Majha Paper

चीनच्या मदतीने भारताला अडकविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न, अमेरिकेने रोखला डाव

दहशतवादाला समर्थन देण्याच्या मुद्यावरून भारताला अडकविण्याची योजना बनवणाऱ्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना अमेरिकेने अयशस्वी केले आहे. जम्मू-काश्मिरमध्ये सक्रीय दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर पाकिस्तानने हा डाव रचला होता. मात्र अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानचा हा प्रस्ताव रोखला.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेने सुरक्षा परिषदेमध्ये सांगितले की ते अधिकृतरित्या पाकिस्तानच्या प्रस्तावाला थांबवत आहेत. पाकिस्ताने 4 भारतीय नागरिकांवर त्यांच्या येथे दहशतवाद पसरवण्याचा आरोप लावला होता. यात अफगाणिस्तानमध्ये सक्रीय भारतीय कंस्ट्रक्शन कंपनीचे इंजिनिअर वेनू माधव डोंगरा यांचा देखील समावेश आहे.

पाकिस्तानाला आशा होती की चीनच्या मदतीने सुरक्षा परिषदेमध्ये वेनू माधवला जागतिक दहशतवादी घोषित करता येईल. अमेरिकेने मागील वर्षी डिसेंबरमध्ये देखील हा प्रस्ताव रोखला होता व पाकिस्तानला डोंगरा विरोधात अधिक पुरावे गोळा करण्यास सांगितले होते. पाकिस्तान अधिकृत पुरावे देण्यास असमर्थ ठरल्याने अमेरिकेने अधिकृतरित्या हा प्रस्ताव थांबवला आहे.

Leave a Comment