आता आयफोन बनला गाडीची चावी, करता येणार कार अनलॉक आणि स्टार्ट

टेक्नोलॉजी कंपनी अ‍ॅपल लवकरच आपल्या आयफोन युजर्ससाठी कारकी (CarKey) नावाचे एक फीचर आणणार आहे. हे फीचर एकप्रकारे डिजिटल चावी असेल, जी तुम्हाला कार उघडण्यास मदत करेल. अ‍ॅपल कंपनीने आपल्या वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फ्रेंसमध्ये या फीचरची माहिती दिली असून, यावेळी कंपनीने आयओएस10 वर एक नवीन सुविधा म्हणून ही फीचर देण्यात येईल असे सांगितले. सर्वात प्रथम या फीचरचा वापर 2021 बीएमडब्ल्यू 5 सीरिजमध्ये पाहण्यास मिळेल. ही डिजिटल चावी कार उघडण्यापासून ते स्टार्ट करण्याचा देखील पर्याय देईल. स्मार्टफोन ट्रेमध्ये ठेवलेल्या आयफोनच्या मदतीने स्टार्ट बटन काम करणे सुरू करेल.

Image Credited – NDTV

डिजिटल चावीचे सेटअप बीएमडब्ल्यू स्मार्टफोन अ‍ॅपच्या माध्यमातून करता येईल. कारचे मालक आपल्या 5 मित्रांसोबत ही सेटिंग शेअर देखील करू शकतात. याच्या मदतीने टॉप स्पीड, इंजिनची पॉवर, रेडिओवरील आवाज सारख्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येईल. अ‍ॅपल आणि बीएमडब्ल्यू अल्ट्रा वाइडबँड तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या डिजिटल चावी निर्मितीवर देखील काम करत आहे. अल्ट्रा वाइडबँग तंत्रज्ञान युजर्सला आपल्या खिशातील अथवा बॅगमधील आयफोनला न हलवता कारला अनलॉक करण्याची परवानगी देते. पुढील वर्षी पर्यंत ही चावी तयार होईल.

Image Credited – NDTV

बीएमडब्ल्यूनुसार, आयफोनसाठी डिजिटल चावी 45 देशात उपलब्ध होईल. 1 सिरिज, 2 सिरिज, 3 सिरिज, 4 सिरिज, 5 सिरिज, 6 सिरिज, 8 सिरिज, एक्स 5, एक्स 6, एक्स 7, X5M, X6M आणि Z4 या 1 जुलै 2020 नंतर निर्मित कारमध्ये हे फीचर मिळेल.

Leave a Comment