मानवता हाच धर्म; क्वारंटाईन सेंटरसाठी बिल्डरने नवीकोरी इमारत मुंबई महापालिकेला स्वाधीन केली

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने हॉस्पिटलमधील बेड संख्या कमी पडत आहे. याशिवाय कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. या क्वांरटाईन सेंटरसाठी महानगरपालिकेच्या शाळा, हॉटेलचा वापर केला जात आहे. प्रत्येकजण जमेल तशी मदत करत आहे. अशातच एका बिल्डरने केलेल्या मदतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुंबईमधील एका बिल्डरने आपली 19 मजली नवीनच बांधकाम झालेली इमारत क्वारंटाईन सेंटर बनविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला सोपवली आहे.

मेहुल सिंघवी असे या बिल्डरचे नाव आहे. त्यांनी सांगितले की, भाडेकरूंशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्वेच्छेने हा निर्णय घेतला. ही बिल्डिंग मलाडच्या एसव्ही रोडवर आहे. यात 130 फ्लॅट्स असून, एका फ्लॅटमध्ये 4 रुग्णांना ठेवले जाईल. बिल्डिंगला कोव्हिड-19 मध्ये बदलण्यासाठी राज्य सरकारने ऑक्यूपेशन सर्टिफिकेट देखील दिले आहे. आतापर्यंत 300 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण येथे शिफ्ट झाले आहेत.

सोशल मीडियावर युजर्स मेहुल सिंघवी यांच्या या कार्यासाठी कौतुक करत आहेत.

Leave a Comment