मारुती सुझुकीने आपली बहुप्रतिक्षित कार एस-प्रेसो सीएनजीला लाँच केले आहे. या एस प्रेसो सीएनजी एसयूव्हीची सुरुवाती किंमत 4.84 लाख रुपये आहे. कंपनीने या सीएनजी कारला एलएक्सआय, एलएक्सआय(ओ), व्हीएक्सआय आणि व्हीएक्सआय(ओ) या चार व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. एलएक्सआय व्हेरिएंटची किंमत 4.84 लाख, एलएक्सआय (ओ) 4.90 लाख, व्हीएक्सआयची 5.08 लाख आणि व्हीएक्सआय(ओ) व्हेरिएंटची किंमत 5.14 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकीची बहुप्रतिक्षित ‘एस-प्रेसो सीएनजी’ लाँच

कंपनीनुसार, एस-प्रेसो सीएनजीचे मायलेज 31.2 किमी प्रति किलोग्रॅम आहे. आधीपासून बाजारात असलेल्या पेट्रोल मॉडेलबद्दल सांगायचे तर एसटीडी आणि एलएक्सआय व्हेरिएंट 21.4 किमी आणि व्हीएक्सआय आणि व्हीएक्सआय+ हे व्हेरिएंट 21.7 किमी प्रती लीटर मायलेज देते.

मारुती सुझुकी एस-प्रेसोमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन मिळते. सीएनजी व्हेरिएंटमध्ये फॅक्ट्री फिटेड किट देण्यात आले आहे. सीएनजी मोडवर हे इंजिन 48एचपी पॉवर आणि 78एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजी मॉडेलमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल.
एस प्रेसो –सीएनजीमध्ये फॅक्ट्री फिटेड किट व्यतिरिक्त कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. या मायक्रो एसयूव्हीमध्ये मिनी-कूपरपासून प्रेरित सर्क्युलर सेंटर कंसोल, स्मार्टप्ले डॉक आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर सारखे फीतर्स देण्यात आले आहे. सेफ्टीसाठी कारमध्ये ड्राइव्हर साइड एयरबॅग, एबीएस, ईबीडी, रिअर पार्किंग सेंसर्स, स्पीड अलर्ट सिस्टम आणि चाइल्ड प्रूफ रियर डोर लॉक फीचर मिळतील. ओ व्हेरिएंटमध्ये पॅसेंजरच्या बाजूला देखील एयरबॅग मिळते.