टीक-टॉकला टक्कर देणाऱ्या या भारतीय अ‍ॅपचा धुमाकूळ, 72 तासात 5 लाखांपेक्षा अधिकवेळा डाऊनलोड

चीनसोबतच्या सीमावादानंतर आता नागरिक चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहे. चीनी मोबाईल अ‍ॅप डिलीट करण्याचे आवाहन केले जात आहे. चीनी अ‍ॅपला पर्याय म्हणून अनेक भारतीय अ‍ॅप देखील प्ले स्टोरवर येत आहेत. चीनी अ‍ॅप टीक-टॉकला टक्कर देण्यासाठी तीन दिवसांपुर्वी लाँच झालेले चिंगारी हे अ‍ॅप लोकप्रिय झाले आहे.

Image Credited – Amarujala

चिंगारी अ‍ॅपला अवघ्या तीन दिवसात जवळपास 5 लाख लोकांनी डाऊनलोड केले आहे. चिंगारी हे एक शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप असून, याला बंगळुरूच्या बिस्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी तयार केले आहे. डेव्हलपरनुसार, लाँच झाल्यानंतर 36 तासाच्या आत चिंगारी अ‍ॅप गुगल प्ले-स्टोरवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये आले आहे. चिंगारी अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजीसह 10 भाषेत उपलब्ध आहे.

Image Credited – Amarujala

या अ‍ॅपद्वारे तुम्ही शॉर्ट व्हिडीओ बनवू शकता व मित्रांना शेअर करता येईल. या अ‍ॅपवर ट्रेंडिंग न्यूज, मनोरंजन, फनी व्हिडीओ, लव स्टेट्स असे व्हिडीओ पाहू शकता. अ‍ॅपमध्ये लाईक, शेअर, व्हॉट्सअ‍ॅप शेअर असे पर्याय देखील मिळतील. हे अ‍ॅप काही प्रमाणे हेलो अ‍ॅप सारखे आहे.

Leave a Comment