कोरोनावरील पतंजलीचे औषध लाँच, 100 टक्के रुग्ण बरा होण्याचा दावा – बाबा रामदेव

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, अद्याप या आजारावर ठोस औषध मिळालेले नाही. मात्र आता योगगुरू रामदेव बाबा यांची कंपनी पंतजलीने या महामारीवर मात करू शकणारे औषध तयार केले असल्याचा दावा केला आहे. रामदेव बाबा म्हणाले की, कोरोना व्हायरसवरील औषधाची जग वाट पाहते होते. आज आम्हाला गर्व आहे की कोरोनावरील पहिले आयुर्वेदिक औषध आम्ही तयार केले आहे. या आयुर्वेदिक औषधाचे नाव कोरोनिल आहे.

हे औषध लाँच करताना रामदेव म्हणाले की, आज एलोपॅथिक सिस्टम मेडिसन पुढे आहे. आम्ही कोरोनिल बनवले आहे. ज्याची 100 लोकांवर चाचणी केली. 3 दिवसांच्या आत 65 टक्के रुग्ण बरे झाले. तर 7 दिवसात 100 टक्के लोक लोक बरे झाले. आम्ही संपुर्ण रिसर्च करून हे औषध तयार केले आहे. औषधाचा 100 टक्के रिकव्हरी रेट असून, शून्य टक्के मृत्यूदर आहे.

Image Credited – Aajtak

त्यांनी सांगितले की, या औषधाच्या निर्मितीसाठी केवळ स्वदेशी वस्तूंची वापर केला आहे. गिलॉय, अश्वगंधा, तुळस, श्वासरी या गोष्टींचा वापर केला आहे. पुढील 7 दिवसात हे औषध पंतजली स्टोरमध्ये उपलब्ध होईल. याशिवाय अ‍ॅप देखील लाँच केले जाणार आहे, ज्याच्या मदतीने औषध घरी पोहचेल.

पतंजलीचा दावा आहे की हे संशोधन पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट (पीआरआय), हरिद्वार अँड नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एनआयएमएस), जयपूर यांनी संयुक्तपणे केले आहे. हे औषध दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वार यांनी तयार केले आहे.

Leave a Comment