मुंबईतील 70 कोरोनाग्रस्त बेपत्ता, पोलीस घेत आहेत शोध

मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. धक्कादायक बाब अशी की आता मुंबईतील 70 कोरोनाग्रस्त गायब झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेने आता या कोरोनाग्रस्तांना शोधण्यासाठी पोलिसांची मदत मागितली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी या रुग्णांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात नवभारत टाईम्सने वृत्त दिले आहे.

मुंबईमधून अचानक 70 कोरोना रुग्ण गायब झाल्याने राजकारण सुरू झाले आहे. बीएमसीच्या विनंतीनंतर मुंबई पोलीस या 70 रुग्णांचे कॉल डेटा रेकॉर्ड तपासात आहे. त्यांच्या मोबाईल फोनची शेवटची लॉकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला जात आहे व त्यांच्या परिवाराची देखील चौकशी केली जात आहे.

याआधी देखील मुंबईतून अनेक कोरोनारुग्ण गायब झालेले आहे. मात्र आता स्वतः महानगरपालिकेनेच हे रुग्ण गायब झाल्याची माहिती दिल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या के पी नॉर्थ वॉर्ड म्हणजेच मलाड भागातून येतात. हे सर्व मागील 3 महिन्यांपासून गायब असून, त्यांची माहिती कोणालाच नाही. बीएमसी त्यांचे टेस्ट रिपोर्ट देण्यासाठी गेले असताना अनेकांच्या घराला कुलूप होते, तर काहींचा पत्ता चुकीचा होता.

मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितले की आम्ही सर्व रुग्णांची माहिती जमा करत असून, लवकरच त्यांना शोधण्याचे काम पुर्ण होईल.

Loading RSS Feed

Leave a Comment