ट्रम्प यांनी लावला एच-1बी व्हिसावर निर्बंध, ट्विटर, गुगल, अ‍ॅमेझॉनने केली टीका

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नोकरीसाठी आवश्यक असणाऱ्या व्हिसावर अस्थायी स्वरूपाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकेत नोकरीची स्वप्न पाहणाऱ्या लाखो लोकांवर मोठा परिणाम होणार आहे. टेक्नोलॉजी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आवश्यक एच-1बी आणि एच-4 व्हिसा, इंटरकंपनी ट्रांसफरसाठी एल व्हिसा आणि नोकरी-शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या जे व्हिसावर सरकारने या वर्षाच्या अखेरपर्यंत निर्बंध घातले आहेत. ग्रीन कार्ड संदर्भात देखील हाच निर्णय घेण्यात आलेला आहे.

मात्र ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर ट्विटर, अ‍ॅपल सारख्या कंपन्यांनी टीका केली आहे. हा निर्णय अदुरदर्शी असून, उलट स्थालांतरित टेक कामगार कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीमधून अमेरिकेला बाहेर काढतील, असे म्हटले आहे. अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी देखील ट्विट करत या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. आम्ही स्थालांतरितांच्या बाजूने नेहमीच उभे राहू व सर्वांसाठी संधी निर्माण करू.

कोरोना व्हायरसनंतर अनेक उद्योग-धंदे बंद झाले आहेत, कामगार कपात करण्यात आल्यामुळे अमेरिकेतील बेरोजगारीचा दर 13.3 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा आधीपासून व्हिसा असलेल्या कामगारांवर परिणाम होणार आहे. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकन नागरिकांना नोकरी मिळावी हा उद्देश आहे. अन्यथा व्हिसावर आलेल्या लोकांना नोकरी मिळेल. नोकरीच्या शोधात असलेले असंख्य लोक आहेत. हा निर्णय नक्कीच अनेकांना आवडेल.

Leave a Comment