मोकळ्या वेळेत शेतात घाम गाळत आहे नवाजुद्दीन, व्हिडीओ व्हायरल - Majha Paper

मोकळ्या वेळेत शेतात घाम गाळत आहे नवाजुद्दीन, व्हिडीओ व्हायरल

कोरोना व्हायरसमुळे चित्रपटांचे शुटिंग बंद आहे. त्यामुळे घरातच असलेले काही कलाकार मोकळ्या वेळेत विविध गोष्टी करत आहे. मात्र काही कलाकार असे आहेत, जे चक्क शेतात घाम गाळत आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी देखील या काळात आपल्या गावी उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाना येथे आहे. नवाजुद्दीन येथे शेतात घाम गाळत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेला नवाजुद्दीनचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नवाजुद्दीने शेतात काम केल्यानंतर ट्यूबवेलच्या पाण्यात हात-पाय धुवत आहे. त्यानंतर अखेर फावडा उचलून चालू लागतो.

नवाजुद्दीनच्या या व्हिडीओची  सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ट्विटरवर या व्हिडीओला आतापर्यंत 4 लाखांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले असून, शेकडो चाहत्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

Leave a Comment