मागील काही दिवसात पुण्यात परतले 8,900 कामगार – जिल्हाधिकारी

मागील काही दिवसांमध्ये जवळपास 8,900 कामगार पुण्यात परतले असून, कामगार विभाग त्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर उद्योग-धंदे, कंस्ट्रक्शन, हॉटेल अशा ठिकाणी काम करणारे शेकडो कामगार आपल्या गावी परतले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली की, रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर पुणे रेल्वे स्टेशन मार्गावरून 144 रेल्वे गेल्या. यातून जवळपास 23 हजार प्रवासी आले. 23 हजारांपैकी विविध राज्यातून आलेल्या जवळपास 8,900 कामगारांची ओळख पटली आहे.

ही संख्या जरी मोठी नसली तरी देखील कामगार विभाग शहरात परतलेल्या या कामगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading RSS Feed

Leave a Comment