अरेच्चा! या ठिकाणी चक्क दुकानदार नसतानाही चालते दुकान

एखादे दुकान बिना दुकानदाराचे चालते असे तुम्हाला कोणी म्हटले तर ? तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र असे एक दुकान चक्क भारतातील मिझोरम येथे सुरू आहे. मिझोरमची राजधानी आयझोलपासून काही तासांवरील सेलिंग येथे हे दुकान आहे.

नवभारत टाईम्सनुसार, हा एक तेथील स्थानिक संस्कृतीचाच भाग आहे. याला नगहा लो डावर म्हटले जाते. या परंपरेनुसार सेलिंग शहरात दुकाने तर उघडी असतात, मात्र दुकानदार तेथे बसलेला नसतो. खास गोष्ट म्हणजे दुकानातून सामान घेतल्यानंतर ग्राहक स्वतःच एका बॉक्समध्ये पैसे टाकून निघून जातात. या दुकानांवर अधिकांश प्रमाणात फळे, पाले-भाज्याच मिळतात. येथील शेतकरी शेतातील उत्पादनांची येथे विक्री करतात.

मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामगंथा यांनी देखील स्थानिक नागरिकांच्या या संस्कृतीचे कौतुक केले. त्यांच्यानुसार नगहा लो डावर एक प्रकारे सोशल डिस्टेंसिंग पाळण्यासाठी देखील उपयोगी आहे.

अनेक युजर्सनी सोशल मीडियावर मिझोरमला भारतासाठी रोल मॉडेल म्हटले. तर काही युजर्सनी हे विश्वास आणि सहकार्य असे म्हटले.

Leave a Comment