जगन्नाथ पुरी रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी - Majha Paper

जगन्नाथ पुरी रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

सर्वोच्च न्यायालयाने 23 जूनला होणाऱ्या जगन्नाथ पुरी रथयात्रेला सशर्त परवानगी दिली आहे. न्यायालयाने या आधी कोरोना व्हायरसमुळे या जगप्रसिद्ध रथयात्रेला परवानगी नाकारली होती. मात्र केंद्राने पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने रथयात्रेला सशर्त परवानगी दिली आहे.

केंद्र सरकारकडून सॉलिसटिर जनरल म्हणाले की, रथयात्रेला परवानगी देण्यात यावी. तेथे कोरोनाच्या पार्श्वभूमी दिशानिर्देशांचे पालन केले जाईल. लोकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा केला जाणार नाही. मंदिराच्या संस्थेसोबत मिळून समन्वय साधून रथयात्रा शक्य आहे.  ओडिशाचे सरकारी वकील हरिश साळवे म्हणाले की, यात्रा पुर्ण राज्यात होणार नाही. केवळ सेवा करणारे आणि पुजारी यात सहभागी होतील व तेथे कर्फ्यू लावण्यात यावा. राज्य सरकार आरोग्यविषयक सर्व सुरक्षा दिशानिर्देशांचे पालन करेल.

कोणत्या दिशानिर्देशांचे पालन करणार असे सरन्यायाधीशांनी विचारले असता. सॉलिसिटर जनरल मेहता यांनी जनतेसाठी आरोग्यासाठी बनविण्यात आलेल्या दिशानिर्देशांचे पालन केले जाईल असे सांगितले. मंदिर समिती, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने ही रथयात्रा पार पाडावी असे न्यायालयाने म्हटले आहे.

Leave a Comment