भूषण कुमार माझ्या नादी नको लागू – सोनू निगम

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील गटबाजी आणि घराणेशाहीवर इंडस्ट्रीमधूनच टीका होत आहे. गायक सोनू निगमने काही दिवसांपुर्वी इंडस्ट्रीमध्ये माफिया असल्याचे म्हटले होते. आता सोनू निगमने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या टार्गेट केल्याचा टी-सीरिजचे प्रमूख भूषण कुमारवर आरोप केला आहे.

व्हिडीओमध्ये सोनू निगम म्हणत आहे की, मी कोणाचेही नाव घेतले नाही. मी फक्त शांतपद्धतीने नवीन लोकांशी प्रेमाने वागावे असे म्हटले होते. मात्र माफिया त्यांच्या ट्रिक्स वापरतील आणि ते माझ्याविरोधात मुलाखती देण्यास सांगतील. ज्या सहा लोकांनी माझ्या विरोधात मुलाखत दिली ते माझ्या जवळचेच आहेत. अनेक वर्ष ते म्यूझिक इंडस्ट्रीमधील अन्यायाविरोधात बोलत होते. मात्र आता ते अचानक दुसरी भाषा बोलू लागले आहेत.

सोनूने भूषण कुमारवर देखील निशाणा साधला. सोनूने म्हटले की, भूषण कुमार तू चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला आहेस. तू ती वेळ विसरलास का जेव्हा माझ्या घरी यायचास आणि म्हणायचा की, भाई भाई माझा अल्बम कर, दिवाना कर, स्मिथा ठाकरेंशी, बाळासाहेब ठाकरेंशी भेट घडवून दे. भाई डॉन अबू सालेमपासून वाचव. आठवत आहे की विसरलास ? सोनूने आपल्या युट्यूबवर अभिनेत्री मरिना कंवरचा व्हिडीओ अपलोड करेल असा इशारा देखील दिला. मरिनाने 2018 मध्ये भुषण कुमारवर लैंगिक छळाचा आरोप केला होता.

याआधी सुशांतच्या निधनानंतर सोनूने व्हिडीओ शेअर करत लोक लवकरच म्यूझिक इंडस्ट्रीमधील आत्महत्येबद्दल देखील ऐकतील. कारण येथे माफिया आहेत, असे म्हटले होते.

Leave a Comment