आम्ही सुशांतसाठी लढणार – करणी सेना

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर आता राजस्थानचे राजपूत देखील त्याला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे आले आहेत. करणी सेनेने सुशांतच्या मृत्यूसाठी लढाई लढण्याची घोषणा केली आहे. श्री राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपाल सिंह मकराना यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 60 हजारांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी लवकरच पुढील योजनेबाबत सांगणार आहे असे म्हटले आहे.

महिपाल सिंह हे या व्हिडीओमध्ये म्हणाले की, क्षत्रियांना साथ दिल्यावर क्षत्रिय तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहतील. संपुर्ण देशात क्षत्रियांच्या विरोधात काय सुरू आहे ? सुशांतचा मुद्दा ज्वलंत आहे. सुशांतने भलेही पद्मावती मुद्यावर अडनाव हटवले होते. मात्र दोन दिवसांनी माफी मागून अडनाव पुन्हा लावले देखील होते. सुशांतने भलेही राजपूत अडनाव लावले नसले तरीही, तो आमचा भाऊ आहे. आम्ही घरात कसेही लढू.

महिपाल सिंह यांनी सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडले असे म्हटले आहे. ज्या लोकांच्या नादी लागून त्याने राजपूत नाव हटवले होते, तेच त्यांच्या मृत्यूस कारणीभूत आहेत. राजपूतांना निवडून निवडून डिमोरलाइज केले जात आहे. ते म्हणाले की, महाराणा प्रताप यांच्या स्वाभिमानासाठी लढलो, तर सुशांत सिंह राजपूतसाठी देखील लढू. आमच्या समाजाविरोधात, इतिहासाविरोधात घडणाऱ्या घटनांविरोधात लढणार. आपल्याला काय करायचे आहे, ते येणाऱ्या काळात सांगणार आहे.

Leave a Comment