व्हायरल : कोरोनापासून वाचण्यासाठी रिक्षावाल्याने केला भन्नाट देशी जुगाड - Majha Paper

व्हायरल : कोरोनापासून वाचण्यासाठी रिक्षावाल्याने केला भन्नाट देशी जुगाड

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग, वारंवार हात धुणे या गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो. कॅब आणि रिक्षाचालक कोरोनापासून वाचण्यासाटी प्लास्टिक कव्हरचा दुभाजक लावत आहेत. अशाच एका रिक्षा चालकाने कोरोनापासून वाचण्यासाठी केलेला भन्नाट जुगाड चर्चेचा विषय ठरला आहे. रिक्षाचालकाने थेट रिक्षातच वॉश बेसिन आणि पाण्याची बाटली बसवली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑटोवाला नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की रिक्षामध्ये हात धुवण्यासाठी वॉश बेसिन, हँड वॉश दिसत आहे. हात धुतल्यावर पाणी जमा होण्यासाठी देखील सोय केली आहे.

https://twitter.com/waterwithoutice/status/1274433370597056513

या व्हिडीओला आतापर्यंत 6 हजारांपेक्षा जास्त जणांनी पाहिले असून, अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment