चीनसोबतच्या तणावामध्ये आता इस्लामिक देशांचा चावटपणा, भारताविरोधात उचलणार हे पाऊल

जम्मू-काश्मिरच्या मुद्यावरून इस्लामिक सहकार्य संघटन (ओआयसी) इमर्जेंसी बैठक करणार आहे. ही बैठक कॉन्टॅक्ट ग्रूपची असून, 1994 मध्ये जम्मू-काश्मिरसाठी या ग्रुपची निर्मिती झाली होती. अनेक दिवसांपासून पाकिस्तान या बैठकीची मागणी करत होता. एकीकडे चीन, नेपाळ आणि पाकिस्तानसोबत तणाव निर्माण झाला असताना, ओआयसीची बैठक होणार असल्याने याला महत्त्व आहे.

Image Credited – aajtak

व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत काश्मिरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा होईल. या बैठकीत जम्मू-काश्मिर कॉन्टॅक्ट देशचे सदस्य आझरबैजान, नाइजर, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्कीचा समावेश आहे. ओआयसीचे सेक्रेटरी जनरल डॉ. युसूफ अल ओथाईमीन म्हणाले की, ही बैठक जम्मू-काश्मिर संदर्भात आहे. या संघटनेत 67 देशांचा समावेश आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात देखील काश्मिरवर अशीच बैठक झाली होती.

Image Credited – aajtak

काश्मिरच्या प्रकरणात पाकिस्तानने ओआयसीद्वारे इस्लामिक देशांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. मात्र ओआयसीमध्ये सौदी अरेबियाचे प्रभुत्व असल्याने त्यांच्या परवानगी शिवाय काहीही होत नाही. त्यामुळे पाकिस्तानने इराण, तुर्की आणि मलेशिया या देशांना सोबत आणण्याचा प्रयत्न केला.

Image Credited – aajtak

या तिन्ही देशांचे म्हणणे आहे की ओआयसी इस्लामिक देशांची महत्त्वकांक्षा समजण्यास अपयशी ठरले आहे. या देशांनी काश्मिर प्रश्नावर ओआयसीपेक्षा वेगळी भूमिका घेण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र सौदी अरेबियाने पाकिस्तानला यात यश मिळू दिले नाही.

Leave a Comment