विश्वविक्रम करण्यासाठी या तरुणाने चेहऱ्यावर बसवल्या हजारो मधमाश्या - Majha Paper

विश्वविक्रम करण्यासाठी या तरुणाने चेहऱ्यावर बसवल्या हजारो मधमाश्या

आपल्याला एखादी मधमाशी दिसली तरी आपण तिच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र केरळमधील एका व्यक्तीला मधमाश्या एवढा आवडतात की त्याच्या शरीरावर तासंतास मधमाश्या बसल्या तरी काहीही होत नाही. आपल्या चेहऱ्यावर सर्वाधिक वेळ मधमाश्या ठेवल्याने नेचर एमएस या तरूणाने जागतिक विक्रम केला आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, 24 वर्षीय नेचरने 4 तास, 10 मिनिटे आणि 5 सेंकद आपल्या चेहऱ्यावर मधमाशा ठेवल्या.

Longest Duration With Head Fully Covered With Bees

Spending an incredible 4 hours 10 minutes and 5 seconds with his head covered in bees, Nature M S from Kerala, India attempted this record to raise awareness of the importance of honey bees and apiculture 🐝

Posted by Guinness World Records on Saturday, July 14, 2018

नेचर म्हणाला की, मधमाश्या या माझ्या चांगल्या मित्र आहेत, इतरांनीही माझ्याप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करावे असे मला वाटते. त्यांचे वडील संजयकुमार हे देखील मधमाश्या आणि मधाचा व्यवसाय करतात. त्याच्या वडिलांनीच त्याला लहान वयापासूनच मधमाशा जवळ असताना कसे वागायचे हे शिकवले. नेचरने सांगितले की, भिती अथवा उदास वाटल्यास वडिलांचा सल्ला आठवतो. माझ्या वडिलांनी मला नेहमीच सल्ला दिला की मधमाश्यांसोबत शांत राहण्यास सांगितले. कधीही धीर न सोडण्यास त्यांनी शिकवले.

आता जवळपास 60 हजार मधमाश्या चेहऱ्यावर बसल्या तरी तो जराही घाबरत नाही. दोन वर्षांपुर्वी देखील मधमाश्यांविषयी जागृकतेसाठी त्याने विक्रम करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने सांगितले की, मधमाश्या चावतात त्यामुळे लोक त्यांना घाबरतात. मधमाश्या सोसायटीमधील महत्त्वाचा जीव आहे. त्यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. मधमाश्यांशिवाय पृथ्वी टिकणार नाही.

Leave a Comment