चीनवरून मनमोहन सिंह यांनी मोदींना दिला ‘हा’ सल्ला

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी गलवान खोऱ्यातील 20 शहीद भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे म्हटले आहे. यासोबत मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत त्यांना शब्दांची निवड करताना सावधगिरी बाळगावी असा सल्ला देखील दिला आहे.

लद्दाखच्या गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचे 40 जवान मारले गेले होते. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला होता. आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देखील मोदींना सल्ला दिला आहे.

मनमोहन सिंह म्हणाले की, 15-16 जूनला गलवान घाटीमध्ये भारताच्या 20 साहसी जवानांना बलिदान दिले. या बहादुर सैनिकांनी साहस दाखवत कर्तव्य पार पाडताना देशासाठी प्राण अर्पण केले. देशाच्या या पुत्रांनी अखेरच्या श्वासापर्यंत मातृभूमिचे रक्षण केले. या सर्वोच्च त्यागासाठी जवान आणि त्याच्या परिवारासाठी कृतज्ञ आहोत. त्याचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही.

Leave a Comment