चीनी मीडिया मोदींचे कौतुक का करत आहे ? – राहुल गांधी - Majha Paper

चीनी मीडिया मोदींचे कौतुक का करत आहे ? – राहुल गांधी

भारत-चीन सीमावाद आता राजकारणाचा देखील मुद्दा झाला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या मुद्यावरून वारंवार सरकारवर निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी ट्विट करत मोदींवर हल्ला केला आहे.

राहुल गांधींनी म्हटले की, चीन आपल्या सैनिकांची हत्या करत आहे. आपल्या जमिनीवर कब्जा करत आहे. मग, चीन मोदींचे कौतुक का करत आहे ? सोबतच त्यांनी वृत्तपत्राचा एक लेख देखील शेअर केला. राहुल गांधींनी शेअर केलेल्या लेखात चीनी मीडिया मोदींच्या भाषणाचे कौतुक करत आहे, अशा आशयाचा मथळा आहे.

दरम्यान, याआधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देखील पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत त्यांना शब्दांची निवड करताना सावधगिरी बाळगावी, असा सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांनी मनमोहन सिंह यांचे स्टेटमेंट देखील ट्विट करत, आशा आहे की पंतप्रधान त्यांचे (मनमोहन सिंह) म्हणणे विनम्रतेने ऐकतील असे म्हटले.

Leave a Comment