जगातील टॉप-10 श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानींचा समावेश

भारतच नाहीतर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा आता जगातील सर्वाधिक श्रीमंत 10 व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे. 64.5 बिलियन डॉलर्स (4.9 लाख कोटी रुपये) संपत्तीसह ते जगातील 9वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी लॅरी इलिसन आणि फ्रान्सच्या फ्रांस्वॉ बेटनकोर्ट मेयर्स यांना मागे टाकले आहे. फेसबुकसह अनेक जागतिक कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केल्यानंतर अंबानींच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.

काही दिवसांपुर्वीच त्यांच्या कंपनीने कर्जमुक्त झाल्याची घोषणा केली होती. रिलायन्सने निर्धारित वेळेच्या आधीच लक्ष्य पुर्ण केले आहे. रिलायन्सने 31 मार्च 2021 पर्यंत कर्जमुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मागील काही आठवड्यात कंपनीने 53 हजार कोटींपेक्षा अधिक राइट्स विकून पैसे जुळवले होते. तर जिओमध्ये 1.6 लाख कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक मिळवली.

 जगातील सर्वात श्रीमंत 10 व्यक्ती –

  1. जेफ बेझॉस – 160 बिलियन डॉलर
  2. बिल गेट्स – 112 बिलियन डॉलर
  3. बर्नाड अर्नाल्ट – 102.8 बिलियन डॉलर
  4. मार्क झुकरबर्ग – 90 बिलियन डॉलर
  5. वॉरेन बफे – 71 बिलियन डॉलर
  6. स्टिव्ह बामर – 70.5 बिलियन डॉलर
  7. लॅरी पेज – 68.1 बिलियन डॉलर
  8. सर्गेई ब्रिन- 66.0 बिलियन डॉलर
  9. मुकेश अंबानी – 64. 5 बिलियन डॉलर
  10. फ्रांस्वॉ बेटनकोर्ट मेयर्स – 62 बिलियन डॉलर

Leave a Comment