अखेर सलमान खानने सुशांतच्या आत्महत्येबाबत होणाऱ्या आरोपांवर सोडले मौन


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अचानक एक्झिटमुळे त्याचा मित्र परिवार, बॉलिवूड इंडस्ट्री, टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर त्याच्या जाण्यामुळे बॉलिवूडमधील अनेक विषयांवर लोकांकडून भाष्य केले जात आहे. नेपोटिझम (कंपूशाही), बॉलिवूडमधील बड्या कलाकारांमध्ये असणारे वैर, झालेली भांडण याबाबत अनेक सेलिब्रिटी देखील खुलेआम बोलत आहे. अनेक कलाकारांना या साऱ्या प्रकारामध्ये ट्रोल देखील व्हावे लागले आहे. या ट्रोलिंगचा सामना अभिनेता सलमान खान याला देखील करावा लागला आहे. दरम्यान यानंतर सलमानने आपले मौन सोडत ट्विटरवरून त्याची प्रतिक्रिया दिली आहे.


या कठीण प्रसंगात सुशांतच्या कुटुंबीयांची आणि त्याच्या चाहत्यांची साथ देण्याचे आवाहन सलमान खानने केले आहे. त्याचबरोबर सलमानने आपल्या ट्विटमध्ये माझी माझ्या चाहत्यांना अशी विनंती आहे की सुशांतच्या चाहत्यांबरोबर उभे राहा आणि त्यांनी वापरलेल्या भाषेकडे लक्ष न देता त्यामागील भावना समजून घ्या. कृपया त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना साथ द्या कारण आपल्या माणसांचे जाणे अत्यंत वेदनादायक आहे. सलमानच्या या ट्विटनंतर अनेकांनी यावर देखील अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तर काहींनी त्याच्यावर आणखी टीका केली आहे तर काहींनी त्याचे कौतुक केले आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर गेल्या काही दिवसांपासून सलमान खानवर विविध आरोप लावण्यात आले आहेत. त्याच्यावर अगदी दबंगचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी देखील टीका केली आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की, त्यांचे करिअर संपवण्यासाठी सलमान जबाबदार आहे. गायक सोनू निगम याने सुद्धा नाव न घेता सलमानवर निशाणा साधला आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment