नेपाळच्या एफएमवर वाजवली जात आहेत भारतविरोधी गाणी, सीमावर्ती भागातील लोकांनी बंद केले रेडिओ ऐकणे


धारचुला (पिथौरागड) – भारत-नेपाळ वादादरम्यान नेपाळच्या एफएम रेडिओवर भारतविरोधी गाणी वाजवली जात आहेत. या गाण्यांमध्ये कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा ही नेपाळची भूमी असल्याचे वर्णन केले जात आहे. ही गाणी वारंवार ऐकल्यानंतर आता सीमेवरील लोकांनी एफएम रेडिओ ऐकणे बंद केले आहे.

भारताने केलेल्या विरोधाला न जुमानता नेपाळने कालापीनी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा या भारतीय भूमीचा समावेश आपल्या नकाश्यामध्ये केला आहे. आता यासंदर्भातील गाणी नेपाळच्या एफएम रेडिओवरही प्रसारित केली जातात. हमरो हो यो कालापानी, लिपुलेख, लिपिंयाधुरा- उठा जागा विर नेपाली… अशी काही भारतविरोधी गाणी ऐकल्यानंतर, नेपाळी गाणी ऐकणारे भारतीय आश्चर्य व्यक्त करत आहेत.

यानंतर धारचुला येथे राहणाऱ्या भारतीय लोकांनी हे एफएम चॅनल ऐकणे बंद केले आहे. नेपाळी एफएम वाहिनीने अशी गाणी प्रसारित केल्याने लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. एवढेच नव्हे तर नेपाळच्या सोशल मीडियावरही भारताविरूद्ध बऱ्याच विवादास्पद पोस्ट केल्या जात आहेत. यूट्यूब चॅनेलमध्येही नेपाळचे लोक कालापानी, लिपुलेख, लिंपियाधुरा यांना त्यांची जमीन म्हणून संबोधत आहेत आणि ते भारतापासून त्यांची मुक्त करण्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment