केआरकेच्या पोलवर ७५ टक्के प्रेक्षकांनी दिला आलियाचे चित्रपट पाहण्यास नकार


मागच्या रविवारी मुंबईतील आपल्या राहत्याघरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. त्यातच त्याने आत्महत्या नैराश्यामुळे केल्याचे म्हटले जात आहे. पण सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला अनेक कलाकारांनी जबाबदार धरले आहे. यामध्ये सर्वाधिक टीका अभिनेत्री आलिया भट्टवर होत आहे. दरम्यान बॉलीवूडचा स्वयंघोषित सिनेसमीक्षक कमाल राशिद खान याने देखील तिच्यावर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर यापुढे तिचे देशातील ७५ टक्के लोकांना चित्रपट पाहायचे नाहीत, असा दावा त्याने केला आहे.


काही दिवसांपूर्वी कमाल खान उर्फ केआरके याने एक पोल केला होता. त्याने या माध्यमातून यापुढे आलिया भट्टचे चित्रपट तुम्ही पाहणार का?, असा प्रश्न विचारला होता. आश्चर्याची बाब म्हणजे ७५ टक्के लोकांनी यावर ‘नाही’ असे उत्तर दिले. या पोलच्या आधारावर केआरकेने भारतातील केवळ १० टक्के लोक आलियाचे चित्रपट पाहतील असा दावा केला आहे.

सध्या सोशल मीडियाव्दारे आलिया भट्टवर प्रचंड टीका होत आहे. तिची सोशल मीडियावरील लोकप्रियता या टीकेमुळे कमालीची कमी झाली आहे. तिचे तब्बल चार लाख ४४ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कमाल खानचे हे ट्विट सध्या सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Leave a Comment