उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या सिलेंडरच्या नियमांमध्ये सरकारने केले बदल


नवी दिल्ली – केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत एलपीजी सिलेंडर वितरणाच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. कोरोना महामारी दरम्यान या योजनेंतर्गत सरकारने गरीबांना तीन महिन्यांसाठी गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत एलपीजी सिलेंडरचे वितरण करण्याचा निर्णय घेतला होता.

एप्रिल आणि मेच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत या योजनेंतर्गत लाभार्थींच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) अंतर्गत आगाऊ निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता, जेणेकरुन नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागू नये. जून महिन्यासाठी हे धोरण सरकारने बदलले आहे. आता लाभार्थ्याला आधी एलपीजी सिलेंडरची किंमत जून महिन्यासाठी स्वत: भरावी लागेल आणि ही रक्कम नंतर सरकार त्यांच्या खात्यात जमा करतील. गरिबांचे कष्ट कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान कमी करण्यासाठी ही योजना सरकारने सुरू केली होती. यामुळे उज्ज्वला योजनेंतर्गत नोंदणीकृत लोकच त्याचा फायदा घेऊ शकले.

या योजनेंतर्गत 14.2 किलोचे तीन एलपीजी सिलेंडर आणि 5 किलोचे 8 एलपीजी सिलेंडर देण्याची तरतूद होती. ही योजना यशस्वी करण्यासाठी 1000 एलपीजी वितरकांशी भेट घेऊन लाभार्थ्यांना वेळीच सिलेंडर मिळावेत याची खात्री केली गेली. सरकारने या योजनेंतर्गत 24 कोटी एलपीजी सिलेंडरचे वितरण करण्याचे लक्ष्य ठेवले होते, पण हे लक्ष्य पूर्ण केले जाणार नाही. केवळ 6.8 कोटी सिलेंडरचे वितरण 20 मे पर्यंत झाले. या वेगानुसार, जूनअखेरपर्यंत 15 कोटींपेक्षा कमी एलपीजी सिलेंडर वितरित होणे अपेक्षित आहे.

Leave a Comment