चीनला ठेंगा दाखवत भारतात 5 हजार 367 कोटींची गुंतवणूक करणार सॅमसंग


नवी दिल्ली – जगाला कोरोनासारखी जीवघेणी देऊन आम्ही तसे काहीच न केल्याचा दावा करणाऱ्या चीनला आता त्याची किमंत मोजावी लागत आहे. त्यातच आता अनेक विदेशी कंपन्यांप्रमाणे मोबाईल फोनमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या दक्षिण कोरियाच्या सॅमसंग मोबाईल कंपनीने आपला प्रकल्प चीनमध्ये न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता भारतातील उत्तरप्रदेशात स्मार्टफोन डिस्प्ले बनविण्याचा प्रकल्प सॅमसंग उभारणार आहे. 5 हजार 367 कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पासाठी ही कोरियन कंपनी करणार आहे. 2019 च्या शेवटी सरकार आणि कंपनी दोघांकडूनही यासंदर्भातील करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

सॅमसंगने भारताला पसंती आकर्षक कर सवलती आणि इतर सोयी सुविधा देण्यात आल्याने कंपनीला दिल्याचे सांगण्यात येत आहे. 1300 जणांना सॅमसंगच्या कारखान्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार असल्याचे इनव्हेस्ट इंडिया या मोहिमेअंतर्गत केंद्राने उत्तर प्रदेश सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. इनव्हेस्ट इंडिया या मध्यस्थी करणाऱ्या आणि परदेशी गुंतवणूक आणण्याचे काम करणाऱ्या खात्याने उत्तर प्रदेश सरकारला पाठवलेल्या सॅमसंगच्या कारखान्यासंदर्भातील पत्राचा रॉयटर्सने हवाला दिला आहे. हा प्रकल्प 2021 पासून सुरु होणार आहे.

Leave a Comment