नितेश राणेंचे शिवसेनेला आव्हान; “पंतप्रधानपद सोडा…शिवसेनेने पुढच्यावेळी मुंबईत महापौर तरी बसवून दाखवावा” - Majha Paper

नितेश राणेंचे शिवसेनेला आव्हान; “पंतप्रधानपद सोडा…शिवसेनेने पुढच्यावेळी मुंबईत महापौर तरी बसवून दाखवावा”


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्रिपदाची उद्धव ठाकरे यांनी धुरा सांभाळल्यानंतर हा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन होता. उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसैनिकाला पंतप्रधानपदी बसवण्याचा आपला इरादा असल्याचे सांगितले.


उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना शिवसैनिकाला भविष्यात पंतप्रधानही करणार, असा निर्धार व्यक्त केला. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या संदर्भात नितेश राणेंनी एक ट्विट केले आहे. पंतप्रधानपद तर लांबच राहिले. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीनंतर शिवसेनेने स्वत:चा महापौर तरी बसवून दाखवावा, असा टोला नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. दरम्यान, शिवसेनेकडून नितेश राणेंच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment