कोरोना उपचाराबाबत पुणे महानगरपालिकेने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय


पुणे – लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात दरम्यान पुणे शहरात बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यानंतर कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. यापूर्वी शहरातील ज्या भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता, आता तेथेही कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

यापुढे लक्षणे नसलेल्या रूग्णांवर घरीच उपचार करण्यात येणार असून घरातच राहण्याचे हमीपत्रही रूग्णांकडून घेण्यात येणार आहे. टेलिमेडिसीनद्वारे अशा रूग्णांवर उपचार करण्यात येतील या निर्णयामुळे पालिका आरोग्य यंञणेवरील 25 टक्के ताण कमी होणार आहे. त्याचबरोबर दाट वस्तीमधील रूग्णांना मात्र कोविड सेंटरमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘को मॉर्बिड’ रूग्णांवरही हॉस्पिटलमध्येच उपचार करण्यात येतील अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त रुग्ण असले तरी, एक दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 5 दिवसांपासून महाराष्ट्रातील निरोगी रुग्णांचा आकडा हा 50% आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3827 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 1935 रुग्ण निरोगी झाले. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता 1 लाख 24 हजार 331 झाली आहे. तर, 62 हजार 773 रुग्ण निरोगी झाले आहे.

Leave a Comment