दरमाह 6 लाख पगार घेणारा पायलट झाला आता डिलिव्हरी बॉय


मुंबई : देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प पडले आहेत, तर काही कपंन्यांनी आर्थिक टंचाईमुळे कर्मचारी कपात करण्याचा देखील निर्णय घेतला. त्यामुळे लॉकडाऊनमुळे बरोजगारीचा आलेख देखील वाढला. पण आता या बेरोजगारी मात करण्यासाठी अनेकांसमोर मिळेत ते काम करण्याशिवाय दुसरा उरलेला नाही.

तत्पूर्वी आम्ही आपल्या केरळमधील एका शिक्षकाने लॉकडाऊनमुळे बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करत असल्याची बातमी दिली होती. पण आता एकेकाळी दरमाह 6 लाख पगार घेणाऱ्या पायलटने पोटासाठी डिलिव्हरी बॉयचे काम करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे आभाळा एवढी स्वप्न उराशी बाळगलेल्या या पायलटला डिलिव्हरी बॉयचे काम करावे लागत आहे.

मागील 4 वर्षांपासून 42 वर्षीय नाकरिण इन्टा पायलट म्हणून काम करत होते. एअरलाइन्समधील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संकटामुळे पगार मिळत नाही. त्याचबरोबर अनेकांना कामावरुन कमी देखील करण्यात आले आहे. त्यातच कोरोनाच्या दणक्यामुळे वैमानिकाला पैसे मिळवण्यासाठी डिलिव्हरी बॉयचे काम करण्यास भाग पाडले.

जेव्हा त्यांच्याकडे पहिल्यांदा सामान पोहोचवण्याचे काम आले, तेव्हा त्यांनी ते सामान व्यवस्थित घरपोहोच केले. हे काम आपण करू शकतो असा त्यांना विश्वास वाटला. पण त्यांना अजूनही विमानसेवेत पुन्हा रुजू होण्याची प्रतीक्षा आहे. वैमानिक होणे हे त्यांचं लहानपणापासून स्वप्न असल्याचे इन्टा सांगतात.

Leave a Comment