सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी ‘हा’ अभिनेता तयार करणार चित्रपट


मुंबईमधील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. पण त्यानंतर त्याने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आणि नैराश्यामुळे आत्महत्या केल्याची सध्या सर्वत्र होत आहे. दरम्यान बॉलीवूडचा स्वयंघोषित सिनसमीक्षक अभिनेता कमाल आर. खान त्याच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटाद्वारे तो सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या लोकांना एक्सपोज करणार आहे.


मी लवकरच सुशांत सिंह राजपुतवर एक बायोपिक तयार करणार असून मी सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या लोकांना या चित्रपटाद्वारे जगासमोर आणणार आहे. मी बॉलिवूडचा द्वेष करतो. सुशांतला न्याय मिळायलाच हवा, अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे.


आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कमाल खान उर्फ केआरके नेहमीच चर्चेत असतो. त्याने यावेळी बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. त्याच्याकडून वारंवार बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कमालचे हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. शेकडो नेटकऱ्यांनी यावर काही तासांत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Leave a Comment