Google Duo मध्ये वाढली व्हिडिओ कॉलिंग युजरची मर्यादा


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजणांनी वर्क फ्रॉम वर्कचा पर्याय अवलंबला आहे. त्यातच प्रत्येकजण आपल्या सगेसोयऱ्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी व्हिडीओ कॉललाच प्राधान्य देत आहेत. आता ग्राहकांची हिच गरज लक्षात घेता गुगलने आपल्या Google Duo या व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅपमध्ये व्हिडिओ कॉलिंग युजरची मर्यादा वाढवली आहे. आता वेब ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये 32 जणांना सहभागी होता येणार आहे.

सुरूवातीला Google Duo मध्ये केवळ 8 जणांना व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी होता येत होते. त्यानंतर ही मर्यादा मार्च महिन्यामध्ये वाढवून 12 करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा कंपनीने या मर्यादेत वाढ केल्यामुळे वेब ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये 32 सदस्यांना सहभागी होता येईल. गुगल क्रोमच्या नव्या व्हर्जनमध्ये हे फीचर वापरता येईल. यासाठी युजर्सना Duo च्या वेब व्हर्जनमध्ये लॉग-इन करावे लागेल. लॉग-इन करण्यासाठी गुगल अकाउंटचा वापरणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला फोन नंबरची गरज लागत नाही.

गुगलने Duo व्यतिरिक्त Meet हे अ‍ॅप देखील सर्वांसाठी मोफत उपलब्ध केले आहे. गुगलने सुरूवातीला Meet अ‍ॅप फक्त प्रोफेशनल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी लाँच केले होते. पण, व्हिडिओ कॉलिंगचे प्रमाण लॉकडाउनमध्ये वाढल्यामुळे कंपनीने Meet अ‍ॅपही सर्वांसाठी मोफत उपलब्ध करुन दिले आहे.

Leave a Comment