अखेर मुकेश अंबानींच्या रिलायन्स समूहाची कर्जमुक्ती!


नवी दिल्ली : मार्केट कॅपच्या हिशोबाने 58 दिवसांत एकूण 1 लाख 68 हजार 818 कोटी देशातील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या रिलायन्स समूहाने कमावले आहेत. कंपनीने राइट्स इश्यू आणि टेलिकॉम कंपनी असणारी रिलायन्स जिओमधील भागीदारी विकून ही रक्कम कमावली आहे.

शुक्रवारी याबाबतची माहिती रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी दिली असून ते म्हणाले की, जगभरातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकीदारांनी डिजीटल प्लॅटफॉर्म जिओमध्ये केलेल्या गुंतवणूकीनंतर आणि शेअर विक्रीच्या माध्यमातून रिलायन्सने मार्च 2021च्या आधी कर्जमुक्त होण्याचे लक्ष पूर्ण केले आहे.


त्याचबरोबर मुकेश अंबानी यांनी यावेळी मला ही घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे. कारण शेअर होलडर्सना केलेले वचन आम्ही पूर्ण केले असून 31 मार्च 2021च्या आधी आम्ही आमच्या निश्चित कार्यक्रमाआधी रिलायन्सला कर्जमुक्त केले आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कर्ज मुक्त झाली आहे. गेल्या 58 दिवसात कंपनीने 1,68,818 कोटी रुपये कमावले आहेत. राइट्स इश्यूमधून देखील रिलायन्सने 53,124.20 कोटी कमावल्यामुळे नेट लेव्हलवर रिलायन्सवर सध्या कोणतेही कर्ज नाही.

Leave a Comment