कोरोनाग्रस्त आमदाराने पीपीई किट घालून केले मतदान - Majha Paper

कोरोनाग्रस्त आमदाराने पीपीई किट घालून केले मतदान


नवी दिल्ली – देशातील 8 राज्यांमध्ये आज राज्यसभेच्या 19 जागांसाठी मतदान सुरू असून आज मध्य प्रदेशमध्ये तीन जागांसाठी मतदान होत आहे. याच दरम्यान एक खास दृष्य शुक्रवारी दुपारी पाहायला मिळाला. काँग्रेस पक्षातील कोरोनाग्रस्त आमदार पीपीई किट घालून मतदान करण्यासाठी पोहोचले होते.

काँग्रेस आणि भाजपचे आमदार शुक्रवारी सकाळपासूनच राज्यसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. पण काँग्रेसचे आमदार कुणाल चौधरी दुपारी एकच्या सुमारास पीपीई किट घालून मतदान करण्यासाठी विधानसभा भवनात पोहोचले. या आमदाराची कोरोना टेस्ट काही दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह आली होती.

एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित असेल किंवा कोरोनाची लक्षणे त्यात आढळली तर त्या व्यक्तीने विलगिकरणात राहणे बंधनकारक आहे. पण या आमदाराने संपूर्ण काळजी घेत मतदान करण्यासाठी विधानसभेत पोहोचले. त्यांनी मतदान केल्यानंतर संपूर्ण विभाग सॅनेटाईझ करण्यात आला, तसेच संपूर्ण मेन गेटदेखील सॅनेटाइज करण्यात आला. मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी तीन जागांसाठी प्रत्येकी दोन-दोन उमेदवार उतरवले आहे. त्यामुळे तेथील चुरस वाढली आहे.

Leave a Comment