लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म झूम मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. आता कंपनीने मोठी घोषणा केली आहे. सुरुवातीला या अॅपच्या सिक्युरिटीवर देखील अनेक प्रश्नन निर्माण झाले होते. मात्र नंतर कंपनीने यात अनेक सुधारणा केल्या. आता कंपनी युजर्सच्या सुरक्षा आणि गोपनीयतेबाबत गंभीर झाल्याचे दिसून येत आहे.
झूमची मोठी घोषणा, आता फ्री युजर्सला देखील मिळणार हे सिक्युरिटी फीचर
झूम इंकने घोषणा केली आहे की, आता कंपनी सर्व युजर्सला व्हिडीओ कॉलिंगमध्ये एंड टू एंड एन्क्रिप्शन देणार आहे. या एन्क्रिप्शनमुळे तिसरी व्यक्ती व्हिडीओ कॉल्सला डिकोड करू शकत नाही. कंपनीने म्हटले आहे की, एक टॉगल स्विच देण्यात येईल. जे कोणत्याही कॉल वेळी अॅडमिन ऑफ अथवा ऑन करू शकतात. याच्या मदतीने पारंपारिक फोन लाईन्स आणि जुन्या कॉन्फ्रेंस रुम फोन्सला ज्वाईन करता येईल.
दरम्यान, व्हॉट्सअॅप, फेसटाईम आणि सिंगल सारख्या अॅपमध्ये आधीपासूनच व्हिडीओ कॉलिंगमध्ये एंड टू एंड एन्क्रिप्शन देण्यात आलेले आहे. झूमनुसार, हे एन्क्रिप्शन आता केवळ पेड युजर्स नाहीतर फ्री युजर्सला देखील मिळेल.