घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी ट्विटरने आणले हे फीचर

घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी ट्विटरने खास सर्च प्रॉम्प्ट लाँच केले आहे. हे सर्च प्रॉम्प्ट घरगुती हिंसा संबंधित अधिक स्त्रोतांची माहिती देईल. प्रत्येकवेळी घरगुती हिंसाचारा संदर्भात कोणताही कीवर्ड सर्च केल्यास, युजर्सला एक प्रॉम्प्ट ट्विटरवर उपलब्ध माहिती आणि मदतीसाठी रिडायरेक्ट करेल. हा ट्विटरच्या #ThereIsHelp या प्रॉम्प्टचा विस्तार आहे. हे खासकरून महत्त्वपुर्ण मुद्यांवर स्पष्ट, विश्वसनीय माहिती शोधण्यासाठी सुरू करण्यात आले होते.

ट्विटरने महिला आणि बालविकास मंत्रालय व राष्ट्रीय महिला आयोगासोबत भागीदारी केली आहे. सर्च प्रॉम्प्ट आयओएस, अँड्राईड आणि mobile.twitter.com वर इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत उपलब्ध असेल. संबंधित कीवर्ड सर्चमध्ये उपलब्ध राहतील याची देखील काळजी ट्विटर टीमकडून घेतली जाईल. या सर्च कीवर्ड्समध्ये #crimeagainstwomen, #domesticviolence, #dowry, #dowrydeath, #genderviolence, #genderbasedviolence, #lockdownviolence, #maritalrape, #POSH, #महिलाहिंसा, #घरेलूहिंसा, #महिलाअत्याचार, #दहेज, #दहेजहत्या, #दहेजप्रथा, #बलात्कार, #भ्रूणहत्या, #कन्याभ्रूणहत्या, #वैवाहिकबलात्कार यांचा समावेश आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात भारतासह जगभरात घरगुती हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. त्यामुळे ट्विटरच्या या सर्च प्रॉम्प्टद्वारे घरगुती हिंसाचाराचे शिकार झालेल्यांना मदत मिळेल.

Leave a Comment