अमेरिकेपाठोपाठ आता नेदरलँडमध्ये देखील गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना

अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडचा पोलिसांकडून मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशात स्मारकांवर हल्ले होत आहेत. निदर्शकांनी अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली होती. आता नेदरलँडची राजधानी अ‍ॅमस्टरडॅम येथे काही अज्ञात लोकांनी महात्मा गांधींची प्रतिमेला स्प्रे पेंटिंगने नुकसान पोहचवले आहे. अज्ञात लोकांनी पुतळ्याच्या आजुबाजूला आपत्तीजनक चित्र बनवले आहे.

अ‍ॅमस्टरडॅमच्या चर्चिलान येथे गांधीजींचा पुतळा आहे. अज्ञातांना या पुतळ्याला लाल रंगाने रंगवले आहे व त्याच्याखाली वर्णभेदासंबंधी टिप्पणी लिहिली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, लवकरात लवकर याची दुरुस्ती केली जाईल व नगरपालिकेत डिकलरेशन दिले जाईल. स्थानिक अधिकारी रुजर ग्रूट वांसिक म्हणाले की, आम्ही अशा घटनांच्या सख्त विरोधात असून, असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही. प्रतिमेला स्वच्छ केले जाईल व याची माहिती लोकांना देण्यात येईल.

पुतळ्याला कोणी नुकसान पोहचवले याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पुतळ्याला स्वच्छ करण्यासाठी अनेक तास लागू शकतात.

Leave a Comment