गुगल क्रोम वेब ब्राउजर्समधील एक मोठी त्रुटी समोर आली आहे. यामुळे लाखो युजर्सची हेरगिरी केली जात होती. एका स्पायवेअरच्या मदतीने युजर्सवर हल्ला केला जात होता व याला मार्केट लिडिंग क्रोम एक्सटेंशनच्या मदतीने क्रोम ब्राउजरमध्ये इंस्टॉल केले होते. 3.2 कोटींपेक्षा अधिक युजर्सने याला डाऊनलोड केले होते. अवेक सिक्युरिटीने या संदर्भात माहिती दिली आहे.
लाखो गुगल क्रोम युजर्सवर ठेवली जात होती पाळत, समोर आली क्रोममधील मोठी सुरक्षा त्रुटी
सिक्युरिटी एजेंसीने या स्पायवेअर बाबत चिंता व्यक्त केली आहे. कारण युजर्स ब्राउजर्सवर ईमेलपासून ते बँकिंग रिलेटेड डेटा एक्सेस करत असतात. अशा स्थितीमध्ये डेटा लीक आणि हेरगिरीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. गुगल पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंककडून सांगण्यात आले की, या रिपोर्टनंतर 70 पेक्षा जास्त मॅलिशिस अॅड-ऑन ऑफिशल क्रोम स्टोरवरून हटवण्यात आले आहे.
गुगल क्रोमवर मिळणाऱ्या शेकडो फ्री एक्सटेंशंस युजर्सला वेगवेगळे फीचर्स देत असतात. रिसर्चरकडून ज्या एक्सटेन्शला फ्लॅग करण्यात आले आहे, त्यातील अधिकांश एका फाईलला दुसऱ्या फॉर्मेटमध्ये बदल असे. स्पायवेअर ज्या एक्सटेंशंसशी जोडलेले आहेत, त्याचा वापर जगभरात लाखो युजर्स करतात. त्यामुळे हेरगिरीचा धोका आणि नुकसान अनेक पटींनी वाढते. या मॅलवेअरद्वारे कोण हेरगिरी करत होते, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.