किआ मोटर्सची बहुप्रतिक्षित सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सॉनेटला काही दिवसांपुर्वी टेस्टिंग दरम्यान पाहण्यात आले. टेस्ट करण्यात येणारे किआ सोनेटचे हे अंतिम प्रोडक्शन मॉडेल आहे. किआची ही छोटी एसयूव्ही मारुती ब्रेझा, ह्युंडाई वेन्यू, टाटा नेक्सॉन आणि महिंद्रा एक्सयूव्ही 300 सारख्या एसयूव्हींना टक्कर देईल. सॉनेटमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आलेले आहे.
लवकरच बाजारात दाखल होणाऱ शानदार ‘किआ सॉनेट’,ही आहेत एसयूव्हीची वैशिष्ट्ये

किआ सॉनेटमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. यात अॅपल कारप्ले आणि अँड्राईड ऑटो सपोर्ट देण्यात आलेला आहे.
प्रिमियम अनुभव देण्यासाठी कंपनी या एसयूव्हीमध्ये बोस साउंड सिस्टम देणार आहे. याशिवाय सॉनेटमध्ये किआचे UVO कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटो क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले आणि पुश बटन स्टार्ट-स्टॉप सारखे फीचर्स मिळतील.
सॉनेट एसयूव्ही 3 इंजिन पर्यायामध्ये येईल. यात 1.2-लीटर पेट्रोल, 1.5-लीटर डिझेल आणि 1.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. डिझेल इंजिनसोबत 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय देखील मिळेल. तर टर्बो-पेट्रोल इंजिन ड्यूल-क्लच ऑटोमॅटिक ट्रांसमिशनने सुसज्ज असेल.
किआ सॉनेटमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसोबत आयएमटी (इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रांसमिशन) मिळेस, जे ऑटो रेव्ह-मॅचिंग फंक्शन सोबत येते. या फंक्शनमुळे क्लच पेडल शिवाय गियर बदलता येतात.
सॉनेट ही किआ मोटर्सची सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. या एसयूव्हीची किंमत 7 ते 11 लाख रुपयांच्यामध्ये असण्याची शक्यता आहे. ऑगस्ट-ऑक्टोंबरपर्यंत ही एसयूव्ही भारतीय बाजारात दाखल होईल.