रशियाने तयार केली कोरोनावरील लस, सुरू केली माणसांवर चाचणी

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्यासाठी वैज्ञानिक दिवस रात्र काम करत आहेत. रशियाने आता कोरोनावरील उपचारासाठी बनविण्यात आलेल्या लसीचे मानवी ट्रायल सुरु केले आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की द्रव आणि पाऊडरच्या स्वरुपात औषध तयार केले आहे. या औषधाचे ट्रायल घेण्यासाठी 38-38 लोकांचे दोन समूह करण्यात आले आहेत.

Image Credited – Aajtak

या दोन्ही समूहांना सैन्याचे जवान आणि सर्व सामान्य नागरिकांना मिळून बनवले आहे. जेणेकरून या लसीचे प्रायोगिक परिक्षण यशस्वी होईल. या औषधाला गामालेया सायंटिफिक रिसर्च इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने तयार केले आहे. या इंस्टिट्यूटचे संचालक अ‍ॅलेक्झेंडर झिंट्सबर्ग यांनी मानवी ट्रायल दीड महिन्यात पुर्ण होईल असे सांगितले.

Image Credited – Times of India

या औषधाचे ट्रायल मॉस्कोच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी होईल. बर्डेको मिलिट्री हॉस्पिटलमध्ये इंट्रामस्क्यूलर इंजेक्शन देऊन हे ट्रायल केले जाईल.  रशियाने सर्व वॉलंटियर्सला या ट्रायलच्या फायदा आणि नुकसानीविषयी माहिती दिली आहे. विम्यावर त्यांची स्वाक्षरी घेण्यात आलेली आहे. वॉलंटियर्सची आरोग्य तपासणी करून ट्रायल सुरू होईल. पहिल्या टप्प्यात 18 अथवा 19 तारखेला लस दिली जाईल व पुढील 28 दिवस त्यांच्या शारीरिक हालचालींवर लक्ष ठेवले जाईल.