निवडणूक जिंकण्यासाठी ट्रम्प यांनी मागितली चीनची मदत, माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सहकारी जॉन बोल्टन यांच्या पुस्तकाने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. पुस्तकात दावा करण्यात आला आहे की ट्रम्प यांनी 2020 मध्ये होणारी राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे मदत मागितली आहे. बोल्टन हे अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. त्यांचे ‘द रूम व्हेअर इट हॅपेंड : अ व्हाईट हाऊस मेमॉयर ‘हे पुस्तक 23 जूनला प्रकाशित होणार आहे.

Image Credited – scroll

पुस्तकातील काही अंशानुसार, ट्रम्प यांनी मागील वर्षी एका शिखर परिषदेमध्ये शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. यावेळी ट्रम्प यांनी आश्चर्यकारकरित्या जिनपिंग यांच्यासमोर अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीविषयी चर्चा सुरू केली होती. ते सांगत होते की चीनची आर्थिक क्षमता अशी आहे की ते अमेरिकेच्या निवडणूक प्रचारावर परिणाम करू शकतात. याचवेळी ट्रम्प यांनी जिनपिंगला त्यांना जिंकवण्याचे आवाहन केले.

बोल्टन यांनी लिहिले की, ट्रम्प यांनी आपल्या चर्चेत अमेरिकेतील शेतकऱ्यांचे किती महत्त्व आहे यावर जोर दिला आणि सोयाबीन व गव्हाची खरेदी केल्याने कशाप्रकारे अमेरिकेच्या निवडणुकीवर परिणाम होईल याविषयी चर्चा केली.

 

Leave a Comment