आता दुर्गम भागात देखील होणार कोरोना टेस्टिंग, सरकारने लाँच केली मोबाईल लॅब

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना सरकार टेस्टिंगचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याच दिशेने पाऊल उचलत एक मोबाईल लॅब लाँच केली आहे. ही मोबाईल लॅब कोरोना टेस्टिंगमध्ये कामाला येईल. ही लॅब कोणत्याही भागात जाऊन टेस्टिंग करेल. या मोबाईल लॅबमध्ये दररोज आरटी-पीसीआर तंत्रज्ञानाने 25 आणि ईएलआयएसए तंत्राद्वारे 200 कोरोना टेस्ट होतील. याशिवाय टीबी आणि एचआयव्ही संबंधित देखील काही टेस्ट होतील.

सरकारनुसार, जेथे लॅबची सुविधा नाही अशा ठिकाणी या मोबाईल लॅबला घेऊन जाणार आहे. म्हणजे गाव-दुर्गम भागात टेस्टिंगसाठी या मोबाईल लॅबचा उपयोग करता येईल.

या दरम्यान डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, देशात फेब्रुवारीमध्ये केवळ 1 लॅब होती. मात्र आता आपल्याकडे 953 लॅब आहेत. यातील जवळपास 700 सरकारी लॅब आहेत. त्यामुळे टेस्टिंग जास्त होतील. मोबाईल लॅबबद्दल त्यांनी सांगितले की, दुर्गम भागात याचा टेस्टिंगसाठी वापर होईल.

दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोनाचे 63 लाख टेस्टिंग झाले आहेत. दररोज 3 लाख टेस्टचे आयसीएमआरचे लक्ष्य आहे.

Leave a Comment