… म्हणून अमेरिकन तंत्रज्ञान वापरून चीन जमा करत आहे 70 कोटी पुरुषांचे डीएनए

मानवाधिकारांचा उल्लंघनासाठी जगभरात कुख्यात असलेल्या चीनने आपल्या देशातील 70 कोटी पुरुषांवर नजर ठेवण्यासाठी एक नवीन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत पोलीस चीनमधील पुरूष आणि युवकांच्या रक्ताचे नमुने घेत आहे, जेणेकरून एक जेनेटिक मॅप तयार करता येईल. हे नमुने जमा केल्यानंतर चीन हायटेक सर्व्हिलांस देशाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकेल.

ऑस्ट्रेलियन स्ट्रेटजिक पॉलिसी इंस्टिट्यूटच्या अभ्यासानुसार, चीन वर्ष 2017 पासूनच नमूने जमा करत आहे. जेणेकरून डीएनएचा विशाल डेटाबेस तयार करता येईल. या डेटाबेसद्वारे चीनी प्रशासन आता व्यक्तीचे रक्त, लाळ आणि अन्य जेनेटिक गोष्टींचा वापर करून त्याच्या नातेवाईकांना ट्रॅक करू शकेल. या अभियानासाठी अमेरिकन कंपनी थर्मो फिशर चीनची मदत करत आहे. याच कंपनीने चीनी पोलिसांना टेस्टिंग किट्स विकले आहेत. या अभियानाच्या मदतीने जेनेटिक डेटाबेसद्वारे नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यास चीनला मदत हईल.

चीनी पोलीस आता या डेटाबेसद्वारे अल्पसंख्याकांना निशाणा बनवत आहे. याशिवाय प्रशासन देशभरात अत्याधुनिक कॅमेरे, फेस रिकॉग्निशन तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहे. तर दुसरीकडे पोलिसांचे म्हणणे आहे की, गुन्हेगारांना पकडण्यासाठी डेटाबेसची गरज आहे व नागरिकांच्या सहमतीनेच डीएनए घेतले जाते.

Leave a Comment